सातारा : जगातल्या पाचव्या क्रमांकांची अत्यंत अवघड समजली जाणारी सातारा हिल मॅरेथॉन सुरु झालीय. सकाळी सहा वाजता फ्लॅग ऑफ करुन या स्पर्धेला सुरुवात झालीय. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीचे हजारो स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. तब्बल सात हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.


विदेशी स्पर्धक 


 इथिओपिया, केनिया, फिनलँड आणि जर्मनी अशा देशातून शंभरहून अधिक स्पर्धकही यामध्ये सहभागी झाले होते. येवतेश्वर घाट आणि परत पोलीस परेड मैदान असा या मॅरेथॉनचा मार्ग असतो.. थंड हवा,धुके,रिमझिम पाऊस आणि निसर्गाचा आनंद घेत स्पर्धक धावले.