Satara Karad Chiplun Highway Gas Tanker Accident : साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण तालुक्यात गॅस टँकरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरु झाली आहे. यामुळे परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसत आहे. सध्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.


अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून कराड-चिपळूण राज्य महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असल्याचे दिसत आहेत. यामुळे अनेकजण रस्ते अपघाताचे बळी ठरताना दिसत आहेत. आता साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर पाटण तालुक्यात गॅस टँकरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर हवेत धुराचे लोळ उठल्याचे दिसत आहे. सध्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या अग्निशमन दलाच्या जवानांकडून गॅस गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. 



परिसरात गॅस गळतीचा त्रास


कराड-चिपळूण राज्य महामार्गावर गॅस टँकरला अपघात झाल्यानंतर या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात गॅस गळतीचा त्रास होऊ लागला आहे. या गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यात नेमका कोणता गॅस आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.