सातारा: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल तब्बल १२ तास उशीराने लागणार आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सहा विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभेची मतमोजणी साताऱ्यात एकाच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला वेळ लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. मात्र, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील मतांची एकाचवेळी मोजणी करायची असल्याने येथील निकाल तब्बल १२ तास लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर साताऱ्यातून विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने याठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही पोटनिवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे.


साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा


राष्ट्रवादीने उदयनराजे भोसले यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात सभा घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी प्रचार संपायच्या आदल्यादिवशी भर पावसात साताऱ्यात केलेले भाषण चांगलेच गाजले होते. त्यामुळे साताऱ्यातील हवा फिरल्याची चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उदयनराजे भोसले यांचा पराभव करणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 


माझ्याकडून चूक झाली; साताऱ्यातील सभेत शरद पवारांची कबुली


दरम्यान, राज्याच्या इतर विधानसभा मतदारसंघातही उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले आहे. हे भाकीत कितपत खरे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.