खा. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे आमनेसामने
घटनेचं गांभीर्य पाहून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटाही दाखल झाला.
सातारा : साताऱ्यात पुन्हा एकदा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे आमनेसामने आले. देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी नगरपालिकेचं पथक जुना मोटर स्टँड इथं आलं. त्यावेळी 'दारुचे दुकान काढु नये' अशी भुमिका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली तर 'दारुचे दुकान पाडा' असे खा उदयनराजेंनी सांगितल्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. घटनेचं गांभीर्य पाहून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटाही दाखल झाला.
पोलिसांचा हस्तक्षेप
यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना जायला सांगा, मगच मी जातो असे सांगितलं.
मात्र दोघांपैकी कुणीही मागं हटायला तयार नव्हतं.
अखेर कायदा हातात घ्यायला लावू नका असं पोलिसांनी सांगितल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे आपापल्या दिशेने निघून गेले.