तुषार तपासे, प्रतिनिधी, झी मीडिया, सातारा : उदयनराजे त्यांच्या बिनधास्त डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. राजे बोलतात त्याची बातमी होते. पण हेच राजे लोकसभेत मात्र गप्प बसल्याचं चित्र आहे. गेल्या साडे चार वर्षात राजे जेमतेम वेळाच लोकसभेत हजर राहिले. त्यातही त्यांनी जनतेशी संबंधित एकही प्रश्न विचारला नसल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात आणि हे काही अंशी खरंही आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या पाठीराख्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. उदयनराजेंचा बिनधास्तपणाही तसा चर्चेचा विषय असतो. विषय कोणताही असो, राजे बिनधास्त बोलणार हे सगळ्यांनाच माहिती आहे.


राजे कधी प्रोटोकॉ़लही पाळत नाहीत. सातारा नगरपरिषदेत नवी कचरागाडी आली तर राजेंनी लगेच टेस्ट ड्राईव्हही घेतली. ते बिनधास्त कॉलर उडवतात, आणि त्याचं कारणही सांगतात.


साताऱ्यात राजेंचा आवाज असला तरी दिल्लीत मात्र त्यांचं फारसं मन रमत नाही. लोकसभेत त्यांची हजेरी जेमतेमच असते. गेल्या साडेचार वर्षांत साताऱ्याच्या लोकांचा एकही प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला नाही. लोकसभेच्या कामकाजात सर्वात कमी सहभागी होणाऱ्या खासदारांमध्ये उदयनराजे असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये छापून आल्यात. साताऱ्यातील काही लोकं मात्र त्यांचं वेगळंच गणित मांडतात. उदयनराजेंनी साताऱ्याच्या प्रश्नांवर लोकसभेत आवाज उठवलाही नसेल. पण त्यामुळं साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही.


...तर साताऱ्याची निवडणूक बिनविरोध करू, शिवसेनेची उदयनराजेंना ऑफर