पिसाळलेला कुत्रा रस्त्यावर दिसेल त्याला चावत सुटला, ३० जण जखमी
सातारा : साताऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास ३० जणांना जखमी केलंय... साताऱ्यातील कोरेगाव रहिमतपूर, ल्हासुर्णे, कुमठे या परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांचा चावा घेतला... रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाला हा कुत्रा चावत होता...
आता या कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न ग्रामस्थ मंडळी करत आहेत. या कुत्र्याने रहिमतपूर या गावातील विलास माने नावाच्या सत्तर वर्षाच्या वयोवृद्धाचा डोळाच निकामी केलाय. जखमी ३० जणांवर सातारा जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रेबिजची लसच उपलब्ध नाही
धक्कादायक म्हणजे, हे जखमी जेव्हा कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले... तेव्हा रुग्णालयात रेबिजची लसच उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.