प्रताप नाईक / कराड, सातारा : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये 'आमचं बी ठरलंय' या टॅग लाईनने धुमाकूळ घातला होता. आता हीच टॅग लाईन सातारा काँग्रेसमध्ये (Satara Congress) असणारी दुफळी भरून काढण्यासाठी  वापरण्यात आली आहे. कट्टर काँग्रेसचे नेते विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) याचा गट पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress  president Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) आणि विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) यांच्या मध्ये मनोमिलन झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) निष्ठावंत. सलग सात वेळा विधानसभेत निवडून येणारे माजी मंत्री विलासकाका उंडाळकर. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत राजकारणात  काका आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबा गटात तब्बल ३० वर्षे वाद होता. पण आता हा वाद संपुष्टात आला असून बाबा आणि काका गटात मनोमिलन झाल्याच दिसून येत आहे. त्यामुळेच 'आमचं बी ठरलं ' असं म्हणत विलासकाका उंडाळकर यांनी सातारा जिल्ह्यात एकसंघपणे काम करेल अस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर स्पष्ठ केलं.


लोक विचारात आहेत, काय ठरलंय. त्यांना आम्ही सांगू इच्छितो आत्ता आमचं बी ठरलंय, असे विलासकाका उंडाळकर यावेळी म्हणाले. काँग्रेसमध्ये शिबिराची पद्धत सुरू करा. विचारधारा आणि मूल्य हे आपलं असेट, असे ते म्हणाले. 


 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या ज्या वेळी निवडणूक लढवली, त्या त्या वेळी उंडाळकर गटांना चव्हाण यांच्यासमोर कडव्ह आव्हान निर्माण केलं.त्यामुळे उंडाळकर गटाची ताकद नेकमी काय आहे हे पृथ्वीराज चव्हाण हे जानतात. त्यामुळेच दोन कट्टर काँग्रेस विचारधारेच्या व्यक्तिमधल्या मनभेदाचा फायदा जातीवादी पक्षाला मिळू नये म्हणून काका आणी बाबा गट एकत्र येणारी गरज होती अस पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ठ केलं.हे सांगत असतानाच मतभेदामुळे पक्षाचं काय नुकसान झालं हे सांगायला चव्हाण विसरले नाहीत.
 
आपण एक मेकासमोर लढलो. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होऊन भाजपने जिल्ह्यात चचू प्रवेश केला. आपापल्या मतभेदांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. त्यांनी केलेल्या प्रयन्तानाला काही ,अंशी यश आलं. त्यामुळे ज्यांनी काँग्रेसच्या तत्वासाठी आयुष्य घालविला त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


 एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत इंनकमिंग सुरू झालं आहे. मग काँग्रेस देखील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस जणांना आणि इतर पक्षात गेलेल्या नेते कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. साताऱ्यामधील ही दृश्ये हेच सांगत आहेत. आत्ता वातावरण इनमिंगचे आहे. काँग्रेस पक्षात देखील  अनेकजण यायला तयार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगितले. आता वातावरण इनमिंगचे आहे. काँग्रेस पक्षात देखील  अनेकजण यायला तयार आहेत पुढच्या काळात आपल्याला कळेल. अनेकजण पक्षात येतील, असे ते म्हणाले.


 केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर,  सांगली मध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढून भाजप सरकारचे वाभाडे  काढले. हे करत असतानाच  खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष मजबूत कसा होईल यादृष्टीने प्रत्येक नेता कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कराडमधील उंडाळकर गटाचा काँग्रेस मध्ये सक्रिय होण्याचा निर्णय म्हणजे त्याचाच एक भाग म्हणावा लागले. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने भाजपला थोपविण्यासाठी एक दिलाने एकत्र येण्याच ठरविलेल दिसत आहे.म्हणूनच नेते देखील आमचं बी ठरलंय, अस सांगत आहेत.