Satyajeet Tambe On AB Form: विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduates Constituency Election Result) निकाल समोर आलाय. यामध्ये काँग्रेसचे कथित बंडखोर, अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झालाय. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर राज्यातील वातावरण आणखी तापल्याचं पहायला मिळणार आहे. अशातच आता विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अखेरची प्रेस कॅन्फरेन्स घेतली आणि खळबळजनक खुलासा केला आहे. (Satyajeet Tambe explanation about why he filled the independent form in the graduate constituency election latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या बदनामीच्या बदनाम करण्याची स्क्रिप्ट तयार होती.  तांबे आणि थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव होता, असा खळबळजनक खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला होता. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला? याबाबत सत्यजीत तांबे यांनी मोठा खुलासा केला आहे.


माझ्याकडे पर्याय नसल्याने मी इंडियन नॅशनल कॉग्रेसच्या नावाने फॉर्म भरला. पण एबी फॉर्म (AB Form) नसल्याने अपक्ष म्हणून स्वीकारला गेला, असं सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe On AB Form) यांनी म्हटलं आहे. मी भविष्यात देखील अपक्षच राहिल, असंही सत्यजीत तांबे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच मी काँग्रेस सोडली नाही, असंही तांबे यावेळी म्हणाले आहेत.


आणखी वाचा- Kasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर


दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सत्यजित तांबे यांचे वडिल सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला होता. सज्यजित तांबे यांच्या या अपक्ष उमेदवारी अर्जावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.