Kasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.

Updated: Feb 4, 2023, 01:03 PM IST
Kasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा (Kasba Peth ) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न होता. ( Maharashtra Politics News ) मात्र, महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरताच आता भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Political News) चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तर पुण्यातील कसबा पेठमधून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.(Bye-election in Assembly Constituencies of Maharashtra)

Maharashtra by-election :  पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, 'ही' नावे चर्चेत

भाजप दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी कोणाला देणार याची घोषणा पक्षातर्फे लवकरच केली जाईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केसरी वाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली. कसब्यामधून भाजप कोणाला उमेदवारी देणार याबद्दल उत्सुकता होती. मात्र, टिळक कुटुंबातून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. याचे संकेत कालच मिळाले होते. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कसबा पेठमधून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आल्याने इतर नावे मागे पडली आहेत.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होते. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने पाच संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय समितीकडे पाठवली होती. त्यात शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश होता. या नावांपैकी पक्ष श्रेष्ठींनी हेमंत रासने यांना सिग्नल दिला.

रासने हे पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिलेले आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सलग चार वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ते विश्वस्त देखील आहेत. कसब्यामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच आपण सोनं करणार असून ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.