COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी आंधळी या गावानं जेतेपद मिळवलं. पानी फाऊंडेशनच्या वतीनं ७५ लाख रूपये, तर राज्य सरकारच्या वतीनं २५ लाख रूपयांचा पुरस्कार या गावानं पटकावलाय. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा आणि सातारा जिल्ह्यातील भांडवली या गावांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. तर नागपूरमधील उमठा आणि बीडमधील आनंदवाडी ही गावं तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पानी फाऊंडेशनचे प्रमुख, सिने अभिनेते आमीर खान यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.


४ हजार गावं स्पर्धक 


 राज्यातील ७५ तालुक्यातील ४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यातील लाखो गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत हजारो कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता निर्माण केलीय. पाण्याच्या प्रश्नात कुणीही राजकारण आणणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.