अकोला : जिल्हापरिषद शिक्षकांच्या वेतनात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचं बाळापूरचे सहायक लेखाधिकारी अरुण साखरकर यांनी उघडकीस आणलं आहे. अनेक शिक्षकांना २० ते ८० हजारापर्यंत अतिरिक्त वेतन दिल्याचे तपासणीत आढळून आले. सातवा वेतन आयोगाची वेतन निश्चित करताना बाळापूर पंचायत समितीमध्ये अनेक शिक्षकांना २० ते ८० हजारापर्यंत अतिरिक्त वेतन दिल्याचे तपासणीत आढळून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच परिस्थिती जिल्ह्यातील सातही पंचायत समितीमध्ये असण्याची शक्यता असल्याने लाखोंचा घोळ असल्याची बाब समोर येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकारची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.