शिर्डीत लाखो साईभक्तांची सुरक्षा रामभरोसे
शिर्डीच्या साईमंदिराच्या मुख्य दर्शन रांगेतील दोन्ही बॅग स्कँनर मशिन बंद असल्याने लाखो साईभक्तांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येतय.
शिर्डी : शिर्डीच्या साईमंदिराच्या मुख्य दर्शन रांगेतील दोन्ही बॅग स्कँनर मशिन बंद असल्याने लाखो साईभक्तांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येतय.
साई संस्थानचं प्रशासन या बॅग स्कँनरसाठी टेंडर प्रोसेस मध्ये गुंतलय. त्यामुळे तो पर्यंत भक्तांच्या सुरक्षेशी खेळच चालणार का असा प्रश्न साईभक्त विचारतायत.
काही महीन्यांपासून हे दोन्ही स्कँनर तसंच डोअर मेटल डिटेक्टरही बंद असून त्यावर धूळ साचली आहे. याबाबत झी 24 तासने विचारणा केली असता साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी कॅमे-यासमोर आताच काही बोलण्यास नकार दिलाय.