तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : पर्यटकांचे आवडतं पर्यटन स्थळ असलेल्या साताऱ्यात एक धक्काकादायक प्रकार उघडकीस आला आहे(Crime New). सातारा शहरता असलेल्या एका कॅफेत अश्लिल चाळे(obscene act) सुरु होते. कॉलेजमधीलच नव्हे तर शाळेतीलही मुले-मुली या कॅफेत येत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी कॅफे चालकाला चोप दिला आणि कॅफे बंद पाडला(Cafe In Satara). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा शहरात पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा कॅफे सुरु होता. या कॅफे मध्ये कॅफेच्या नावाखाली शाळा आणि महाविद्यालयांची अल्पवयीन मुले,मुली येत असत. या कॅफेत मुला मुलींचे बिनधास्तापणे अश्लील चाळे सुरु असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शानास आली. 


संतप्त नागरीकांनी या कॅफे चालकाला चोप दिला. तसेच  हा कॅफे देखील त्यांनी बंद पाडला. जिल्ह्यातील अशा अनाधिकृत कॅफेंवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


शालेय मुलांवरही प्रभाव


कॉलेजचे विद्यार्थी बऱ्याचदा लेक्चर बुडवुन मित्र मैत्रींसह फिरत असतात. आता याचा प्रभाव शालेय मुंलावर देखील पहायला मिळत आहे. कारण या कॅफेमध्ये फक्त कॉलेजमधीलच नाही तर शाळेतीलही मुले मुली येत होत. बऱ्याचदा ही मुले शाळेच्या गणवेशातच या कॅफेत येत होती. कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने याचे गंभीर परिणाम पहायला मिळत आहेत. मुलांमध्ये एकमेकांचे अनुकरण करण्याची स्पर्धा लागल्याते दिसत आहे.  


लिफ्टमध्ये अश्लिल चाळे


नवी मुंबईच्या हायप्रोफाईल सोसायटीत देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. लिफ्टमध्ये एका तरुणाचे अश्लिल चाळे सुरु होते. पनवेल मधील तळोजा येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला.  हा सर्व प्रकार लिफ्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. लिफ्ट मध्ये एक मध्यवयीन पुरुष आणि एक महिला दोघेजण असल्याचे दिसत आहे. लिफ्टमध्ये एकट्या महिलेला बघून आरोपीने अश्लिल चाळे सुरु केले. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लिफ्ट मधील सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक केली. कलम 354 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.