नाशिक : नाशिक जिल्ह्यात मनमाडपासून जवळ चांदवड रोडवर शाळेच्या व्हॅनला अपघात झाला. या दुर्घटनेत नर्सरीचे १० विद्यार्थी जखमी झालेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरु आहेत. शहरापासून जवळ असलेल्या कांचन सुधा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅनचा अपघात झाल्याचे कळताच पालकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. गंभीर बाब म्हणजे अपघातानंतर पोलीसांच्या येण्याअगोदर अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पळवून नेऊन ते शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले. 



त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. एकाप्रकारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.