कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : यूनिवर्सल स्कूलच्या बसला ब्रम्हांड सिग्नल येथे अपघात झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर हा अपघात झाला. काही विदयार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने बस चालवणाऱ्या बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ब्रम्हांड सिग्नल येथे यूनिवर्सल स्कूलची बस चुकीच्या दिशेने येत होती. या बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर चार ते पाच गाड्या इथे एकमेकांवर आदळल्या. दरम्यान स्कूल बसमधील एक ते दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे.