चंद्रपूर : रामनगर दाताळा पुलाशेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. हा मृतदेह व्यकंट गिरी यांचा असून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस कर्मचा-यांच्या पाल्यांसाठी चालविण्यात येणा-या शहीद हेमंत करकरे इंग्लिश स्कूलच्या संचालकपदी व्यंकट गिरी होते. तसंच गिरी हे जिल्ह्यातील मोठे कंत्राटदारही होते. ते काही दिवस बेपत्ता असल्याची होती तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती त्यांचा शोधही सुरु होता. 


या शोधादरम्यानच त्यांच्या मृतदेह मिळाला यावेळी त्यांच्या खिशात सुसाई़ड नोट मिळाली. शाळेतील तीन शिक्षकांच्या दबावाची माहिती त्यांनी त्यात लिहीली होती.