प्रेम प्रकरणातून शाळकरी मुला-मुलीची आत्महत्या
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील दोन शाळकरी मुला-मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलीये.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील दोन शाळकरी मुला-मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलीये.
जंगलात जाऊन आत्महत्या
तिरोडा तालुक्याच्या बोदलकसा गावाच्या जंगलात विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघेही आपल्या घरून शाळेत जातो, असे सांगून सकाळी १० वाजता निघाले होते. नंतर दोघांनीही तालुक्यातील बोदलकसाच्या जंगलात जाऊन विष प्राशन केले.
आत्महत्या की हत्या
जंगलात गुरे चरणाऱ्या गुराख्याला याचे मृतदेह दिसताच. त्याने याची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. दरम्यान, या दोघांनी कॅट प्राशन करून आत्महत्या केली की यांना विष देऊन यांची हत्या करण्यात आली, याचा शोध देखील तिरोडा पोलीस घेत आहेत.