Holidays In September 2023: शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. एकतर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सणासुदीनिमित्त शाळेला सुट्ट्या असणार आहेत. रक्षाबंधन, नारणी पोर्णिमा सणाची सुट्टी ऑगस्टच्या शेवटी गेली असली तरी आता सप्टेंबर महिनाही नव्या सुट्ट्यांनी मुलांचे स्वागत करत आहेत. कोणत्या आहेत या सुट्ट्या? याबद्दल जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 किंवा 7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी/दहीहंडी निमित्त शाळांना सुट्टी असणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह ठराविक राज्यामध्ये हा सण धुमधडाक्यात साजरा होतो. त्यामुळे  
श्रीकृष्ण जन्माष्टमी/दहीहंडीची सुट्टी राज्य सरकारच्या आदेशानुसार ठरवली जाते. यानंतर विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. यापुढे शालेय विद्यार्थ्यांना 28 सप्टेंबर 2023 रोजी मिलाद उन-नबी / ईद-ए-मिलादची सुट्टी मिळणार आहे.


4 रविवारच्या सुट्ट्या


सणांच्या सुट्ट्यांसोबत शालेय विद्यार्थ्यांना रविवारच्या सुट्टयांची जोड तर मिळणार आहेच. देशभरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना या सणासोबत रविवारच्या सुट्ट्या असतील. सप्टेंबर 2023 मध्ये 3, 10, 17 आणि 24 रविवार  आहेत.  यासोबतत काही शाळा-महाविद्यालयांना दर शनिवारीदेखील सुट्टी असते. तर काहींना दुसऱ्या शनिवारी किंवा शेवटच्या शनिवारी सुट्टी दिली जाते. गणपती आगमनासाठी गावी जायचे असेल तर 18 सप्टेंबर रोजी सुट्टी घेऊन तुम्ही लाँग वीकेंड साजरा करता येणार आहे. 


मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार


सप्टेंबरमध्ये बॅंकांनाही सुट्ट्या 


शाळांसोबत सरकारी कार्यालये आणि बॅंकांनाही याकाळात सुट्टी असेल. दैनंदिन बॅंकासंदर्भातील कामे करण्यासाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागते. यासाठी नेमक्या किती सुट्ट्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.


6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी 


7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी


18 सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थी


19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)


20 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (दुसरा दिवस)/नुखाई


'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी


आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर


22 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिन


23 सप्टेंबर रोजी महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन


25 सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेवाचा जन्मोत्सव


27 सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी: मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस)


28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद


29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार.


शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या पकडल्यास सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 18 दिवस बँका बंद राहतील.


3 सप्टेंबर : रविवार


9 सप्टेंबर : दुसरा शनिवार


10 सप्टेंबर : दुसरा रविवार


17 सप्टेंबर : रविवार


23 सप्टेंबर : चौथा शनिवार


24 सप्टेंबर : रविवार