मुंबई : पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमध्ये बदल झाल्यानं नवीन वर्षात म्हणजेच २०१८ मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर २५ ते ३० वर्षांनी पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग कमी होतो. गेली पाच वर्ष ही प्रक्रिया सुरू आहे. त्याचच परिणाम म्हणून मोठ्या तीव्रतेचे सर्वाधिक भूकंप २०१६ मध्ये नोंदवण्यात आले. 


आताच्या मालिकेचे २०१७ हे सलग चौथं वर्ष आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या गती मंदावण्याच्या प्रक्रियेतील २०१८ हे अखेरचं वर्ष असेल. म्हणूनच रिश्टर स्केलवर ७.० तीव्रतेचे सर्वाधिक भूकंप होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. याबाबत भूगर्भशास्त्रज्ञ अरुण बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.