Alphonso : मोसमातील पहिला हापूस बाजारात; पाहा काय आहे किंमत
यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याचं पहिलं फळ
पुणे : फळांचा राजा, अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचा नवा मोसम सुरु झाला आहे. आंब्याचं पिक नेमकं कसं येणार, आलंच तर त्याचा खप कसा आणि कुठे केला जाणाच या प्रश्नांनी बागायतदारांच्या मनात घर केलेलं असतानाच आता यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याचं पहिलं फळ पुण्यातील बाजारांच्या दिशेनं रवाना झालं आहे.
पुण्याच्या दिशेनं रवाना झालेल्या आंब्याच्या प्रत्येत पेटीला 18 हजार रुपये इतका दर मिळत आहे. देवगड हापूरच्या या पाच पेट्या पुण्याकडे गेल्या आहेत. यंदा जवळपास 25 दिवस आधीच आंब्याचं फळ बाजारांत दाखल झालं आहे.
मालवणातील कुंभारमाठा या भागातील उत्तम फोंडेकर यांनी या पहिल्या हापूसच्या पेट्या यंदाच्या वर्षी बाजारात पाठवल्या आहेत. आंब्याला मिळाललेया दरामुळं त्यांना फार आनंदही झाला आहे.
हापूसचा प्रवास तर, आता सुरु झाला आहे. येत्या काळात या फळांच्या राजाचे दर किती वरखाली होतात आणि त्याचा बागायतदारांना नेमका किती फायदा होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.