जळगावात कोरोनाचा दुसरा रुग्ण, एकाच कुटुंबातील १४ जण क्वारंटाईन
जळगावात बुधवारी रात्रीआणखी ६० वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
जळगाव : काही दिवसांपूर्वी शहरात एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारी रात्रीआणखी ६० वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे . जळगाव जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन झाली आहे.
जळगाव शहरात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. सालारनगर मधील साठ वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर या रुग्णाच्या कुटुंबातील १४ सदस्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. त्यांनाही जणांना शाहू महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच सालारनगर आणि बागबान मोहल्ला पोलिसांनी सील केला असून जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळल्याने लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.