मुंबई : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी कोल्हापूरात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात एका दिवसासाठी म्हणजेच 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी जाहीर केली आहे. नक्की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय म्हटले आहे पाहूया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. 18 आणि 19 सप्टेंबर कागल आणि कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत किरिट सोमय्या यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, ते कोल्हापूर जिल्ह्यात येऊ आल्यानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. सोमय्या कोल्हापूर वासियांना आव्हान देत आहेत. त्यांना कोल्हापूरी भाषेत उत्तर दिले जाईल. खिंडित गाठून गनिमी काव्याने उत्तर दिले जाईल. अशी मते व्यक्त केली आहेत.  


दिनांक 20 सप्टेंबर रोजी किरिट सोमय्या यांचा दौरा आहे. तसेच हसन मुश्रीफ यांचे देखील कागल मध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सुमारे 15 हजार ते 20 हजार जनसमुदाय जमन्याची शक्यता आहे. सोमय्या यांच्या मार्गावर अडथळा निर्माण करून अथवा गनिमी काव्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या कायदा सुवस्थेचा विचार करता. तसेच सार्वत्रिक हिताचा विचार करता दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र जमणेस कलम 144 अंतर्गत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 


असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केला आहे. किरिट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी कोल्हापूरात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरला जाणार आहेत.