कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरातल्या  पाच साखर कारखान्यांवर साखर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. एफआरपीची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तांनी जोरदाण दणका देताना  जप्तीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा, भोगावती, पंचगंगा आणि सांगली जिल्ह्यातील माणगंगा आणि महाकाली या पाच सारख कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साखर आयुक्तांनी काढलेल्या या आदेशांनी एकच खळबळ उडालीय. एफआरपीची रक्कम वेळेत दिली नसल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.