TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड
TET scam case : बोगस 7,900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
पुणे : TET scam case : बोगस 7,900 शिक्षकांची ( TET teachers) यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आता पुणे पोलिसांकडून (Pune Cyber Police) लवकरच कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाले आहेत.
टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. बोगस 7,900 शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार झाली आहे. अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Crime Police) तयार आहेत. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन पास केले गेले.
28 मार्क असताना अंतिम निकालात 82 मार्क्स दिल्याचे उघड झाले आहे. यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आता खातरजमा झाल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणात सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशनचाही सहभाग होता. आता त्याला 25 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून बंगळूरु न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे.
टीईटी पेपरफुटी गैरव्यवहात जे सॉफ्टवेअर वापरण्यात आले, त्या कंपनीचा संस्थापक गणेशनला पुणे सायबर पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. त्यानुसार तो पोलिसांसमोर हजर झाला. मात्र अटक होऊ नये म्हणून त्याने बंगळूरु न्यायालयाचे संरक्षण मिळवले आहे. न्यायालयाने त्याला 25 फेब्रुवारीपर्यंत संरक्षण दिले आहे.