Pune Fire : पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; 90 स्टॉल आगीत जळून खाक!
Pune Fire News: काल मध्यरात्री दोन वाजता हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे आग लागली. जवळपास 90 स्टॉल व सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
Pune News: पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास हडपसरमधील (Hadapsar) हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला आग (Fire InVegetable market) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत (Severe fire broke out in Pune) मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली.
जवळपास 90 स्टॉल (Market Stall) आणि सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान झालंय. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमाराच एकच गोंधळ उडाल्याचं समोर आलं होतं. आसपासच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना (Pune Police) याची माहिती दिली. तर अग्निशमन दल (fire brigade) तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे.
पाहा Video -
काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट (Swargate) परिसरात भीषण आगीची घटना घडली होती. या आगीत ३ दुकाने जळून खाक झाली होती. या आगीत भंगार दुकान, गादी घर आणि रद्दी डेपोची दुकाने जळाल्याने मोठं नुकसान झालं होतं. गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, महिनाभरापूर्वी पुण्यातील कोथरुड (Kothrud) येथील आशिष गार्डन जवळील श्रावणाधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. काही नागरिक देखील बिल्डिंगमध्ये अडकले होते. त्यावेळी अग्निशमन दलाकडून 5 फायरगाड्या आणि 1 पाण्याचा टँकर पाठवण्यात येणार असल्याने अनेकांचे जीव त्यावेळी वाचले होते.