मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यामातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून तिला ब्लॅकमेल करुन अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीय. आठवडाभरात अशा तीन घटना समोर आल्यात. यातील एका प्रकरणात अकरावीच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. यातील काही गुन्हेगार अल्पवयीन आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांनी दिलीय. 


फेसबुकचा वाढता वापर, मित्रासोबत काढण्यात आलेल्या फोटोंचा पुढे होणारा गैरवापर, चौकलेटपासून लग्नापर्यंतचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याची मोडस ऑपरेंडी या घटनांतून समोर येतेय. तर काही प्रकणात घरत कोणी नसल्याची संधी साधत नराधमांनी चिमुरड्यांना लक्ष केल्याच्या घटनाही कायम समोर येत असल्याने पालकांची जबाबदारी वाढलीय.


महिला पोलिसांच्या माध्यमातून शालेय महाविद्यालयीन मुलींचं प्रबोधन केलं जातंय. वेळोवेळी लॉज चेकिंग केली जाते मात्र तरीही असे प्रकार घडत असल्याने बिघडणारं सामाजिक स्वास्थ सुधारण्यासाठी समाजानंच पुढं येण्याची गरज आहे.