पहाटेचा शपथविधी पाठ सोडेना; शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना थेटच विचारले....
यापुढे एकनाथ शिंदे यांच्या वरील टीका सहन केली जाणार नाही असा इशारा शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना दिला आहे.
तुषार तपासे, झी मिडिया, कोल्हापूर : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजाकारणातील(Maharashtra Politics) कधीही विसरता न येणारा असा विषय बनला आहे. जवळपास तीन वर्षे झाली तरी या पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट केले जातेय. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई(Shambiraje Desai) यांनी याच शपथविधीवरुन अजित पवारांना थेट प्रश्न विचारत त्यांच्या बंडखोरीवर भाष्य केले आहे(Latest Political Update).
तीन वर्षांपूर्वी झाला पहाटेचा शपथविधी
सन 2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घतेली. पहाटे झालेल्या शपथविधीवरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला. अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेला उधाणा आले होते.
पहाटे शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होत का? शंभूराज देसाई यांचा सवाल
याच पहाटेच्या शपथविधीवरुन मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पहाटे शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होत का? असा खोचक सवाल शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना केला आहे.
अजित पवारांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेत 48 तासाचं सरकार स्थापन केलं ती बेईमानी नव्हती का? असा सवालही शंभूराज देसाई यांनी विचारला आहे.
यापुढे एकनाथ शिंदे यांच्या वरील टीका सहन केली जाणार नाही असा इशारा शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना दिला आहे.