पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेही गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन अंदुरेबरोबरच कळसकरही प्रत्यक्ष मारेकरी असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. कळसकर सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहे. एटीएसच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सीबीआयने शनिवारी अंदुरेला अटक केली आहे. 19 ऑगस्ट 2013 ला कळसकर आणि अंदुरे यांनी औरंगाबादहून पुण्यासाठी बस पकडली.  20 ऑगस्टला सकाळी दोघे शिवाजी नगरमध्ये पोहोचले. ओकांरेश्वर मंदिराजवळ त्यांनी बाईक घेतली. 6 वाजून 40 मिनिटांनी दोघेही बाईकवरुन ओकांरेश्वर पूलावर पोहोचले. दाभोऴकर 7 वाजून 10 मिनीटांच्या सुमारास पूलावर पोहोचले. त्यांच्यावर कळसकरनं 2 तर अंदुरेनं एक गोळी झाडली.