शरद पवारांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे मागितली २ दिवसांची मुदत, अजितदादांचा मात्र नकार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष कायम
मुंबई : शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींना फोन करून २ दिवसांची मुदत मागितली आहे. आमदारांशी चर्चा करण्यास वेळ हवा असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. पवारांनी अहमद पटेल यांना फोन होता. माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोणताही फोन केला गेला नाही. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मुदत मागितली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच अजूनही सुटलेला नाही. काँग्रेस आमदार अजूनही राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्येच आहेत. महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठीचं संख्याबळ सादर करायचं आहे. त्यासाठी काँग्रेसची काय भूमिका आहे हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असंही रघू शर्मा यांनी म्हटलं आहे.