कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षीय नेत्यानी या कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान, शरद पवारांनी कोल्हापुरात महाडीक आणि हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. शरद पवारांनी राजकीय दिलजमाई सुरू केल्याची चर्चा आहे.


ऊस दराबाबत थोडं लक्ष घाला- राजू शेट्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले. ऊस दराबाबत थोडं लक्ष घाला, जाहीर केलेले दर मिळत नसल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी पवारांकडे केली. 


ऊस दरासाठी आंदोलन झालं पाहिजे - शरद पवार


तर राजू शेट्टी यांच्या भाषणाचा संदर्भ घेत ऊस दरासाठी आंदोलन झालं पाहिजे नाहीतर शेतक-यांना न्याय मिळणार नाही असं मत व्यक्त केलं.