मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात महाविकासआघाडीने सरकार विरोधात 'जोडे मारो आंदोलन' सुरु केले आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे सगळे नेते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेल्या माफीवर शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार कुणाचेही असले तरी लहान लहान घटकांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम ही संस्था करते, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. बदलापुरातील प्रकारामुळे राज्यात अस्वस्थता पसरली. एक दिवस जात नाही की महिला अत्याचाराची घटना येत नाही. त्यांच्याबाबत कठोर भूमिक घ्यायला हवी, ही गोष्ट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी अधोरेखित केली आहे. 


मुस्लिम समाजाची स्थिती चिंताजनक आहे. दारिद्रय वाढतंय,शिक्षण कमी आहे.द्वेष पसरवण्याचे काम सुरूय.हे चिंताजनक.दंगे झाले तर सामान्य लोकांना फटका बसतो. 


लोकसभा मतदानात सकाळी 7 वाजता सर्वाधिक लोक मुस्लिम  समाजाचे होते. जबाबदारी म्हणून ते आले होते. ज्यांच्या पराभव झाला, ते लोक या समाजात जावून तुला काय मिळाले असं विचारत आहेत. आपण त्यांना विश्वास द्यावा लागेल


शिवाजी महाराज पुतळ्याबाबत कामाचा दर्जा नव्हता. काहीजण म्हणतात वा-यामुळं पुतळा कोसळला.गेटवे वरचा पुतळा का नाही कोसळला.ज्याची कुवत नसताना त्याला काम दिले गेले. घाईगडबडीत काम झाल्याचे, शरद पवार म्हणाले आहेत. 


सरकार सत्तेचा कारभार करत आहे.भ्रष्टाचाराला प्रोत्साहन हे सरकार देत असल्याचा आरोपही शरद पवारांनी केली आहे. 


माफी आणि नंतर...


पंतप्रधानांनी माफी मागितली व लगेच सांगितले की सावरकरांची का माफी नाही मागितली? असा सवाल केला .विषय काय..सावरकर व शिवाजी महाराजांची एकत्र चर्चा होवू शकते का? तुलना कशा पद्धतीने करतात, असा सवालही शरद पवारांनी विचारला. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहीत करतात एवढंच नव्हे तर अंगाशी आले की मग माफी मागतात. सावरकर स्वातंत्र्याची अनेक वर्ष तुरुंगात होते, पण तरी यांची तुलना होऊ शकते का? असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे.