'पवारांवर चित्रपट बनवायला आवडेल, आम्ही त्यांना बांधावरचा नेता म्हणतो, ते रेल्वेने...'; दिग्दर्शकाची इच्छा

Movie On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने व्यक्त केली आहे. शरद पवारांवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त करताना या दिग्दर्शकाने या निवडीमागील कारणही सांगितलं आहे. कोण आहे हा दिग्दर्शक आणि तो काय म्हणालाय जाणून घ्या...

| Sep 18, 2024, 16:53 PM IST
1/11

sharadpawarmovie

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांवर चित्रपट बनवण्याची इच्छा एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने व्यक्त करताना स्वत: शेतकरी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. हा दिग्दर्शक कोण आणि त्याने रेल्वेचा संदर्भ देत शरद पवारांबद्दल काय म्हटलंय जाणून घेऊयात.

2/11

sharadpawarmovie

'धर्मवीर-2' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंची जीवनावर आधारित 'धर्मवीर' चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.  

3/11

sharadpawarmovie

अभिनेता प्रसाद ओकने पहिल्या भागाप्रमाणे यंदाही 'धर्मवीर'मध्ये आनंद दिघेंची भूमिका साकारली असून 'धर्मवीर-2'चं लेखन तसेच दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे यांनी केलं आहे.  

4/11

sharadpawarmovie

सध्या 'धर्मवीर-2' प्रमोशनच्या निमित्ताने प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांच्याबरोबरच चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते आणि निर्माते मंगेश देसाई वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहेत.  

5/11

sharadpawarmovie

शरद पवारांवर का चित्रपट करायला आवडेल याबद्दल बोलताना प्रणवी तरडेंनी स्वत: शेतकरी असल्याचा संदर्भ  दिला.

6/11

sharadpawarmovie

'धर्मवीर'मध्ये आनंद दिघेंच्या आयुष्यावर प्रकाश टाकल्यानंतर आता पुढे कोणत्या राजकीय नेत्यावर चित्रपट करावासा वाटतोय? असा प्रश्न प्रवीण तरडेंना 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला.  

7/11

sharadpawarmovie

हा प्रश्न ऐकल्यानंतर प्रवीण तरडेंनी क्षणाचाही विलंब न लावता, 'शरद पवार' असं उत्तर दिलं.   

8/11

sharadpawarmovie

"मी एक शेतकरी आहे. पवार साहेबांना आम्ही बांधावरचा नेता म्हणतो. ते सतत शेतावर, बांधावर असतात. त्याचं आयुष्यही सिनेमॅटिक आहे," असं प्रवीण तरडे शरद पवारांबद्दल म्हणाले.  

9/11

sharadpawarmovie

"मला शरद पवार साहेबांवर चित्रपट करायला आवडेल. ते सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. बारामतीहून दौंडला रेल्वेतून भाज्या विकायचे. त्यांचा हा प्रवास खूप रंजक आहे," असं प्रवीण तरडेंनी म्हटलं.  

10/11

sharadpawarmovie

मात्र या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे स्वत: शाशंक आहेत. त्यांनी शेवटी, "आता ते (शरद पवारांवर चित्रपट बनवणं) माझ्या वाट्याला येईल की नाही माहित नाही," असं म्हणाले.  

11/11

sharadpawarmovie

प्रवीण तरडेंनी शरद पवारांबरोबर पतंगराव कदम यांच्यावर सिनेमा बनवायला आवडेल, असंही शेवटी आवर्जून सांगितलं. पतंगराव कदम यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य फार मोठं आहे.