5 स्टार सेफ्टी रेटिंग, ड्युअल CNG अन् किंमत फक्त 6.12 लाख; तब्बल 4 लाख ग्राहकांनी खरेदी केली 'ही' कार

अशीच एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही एसयुव्ही सेल्स चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.   

| Sep 18, 2024, 17:08 PM IST

अशीच एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही एसयुव्ही सेल्स चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 

 

1/10

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही काळापासून SUV ची मागणी वाढली आहे. कमी किंमत, लो मेंटेनन्स आणि चांगला मायलेज यामुळे या कारला ग्राहकांची पसंती मिळते.   

2/10

अशीच एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही एसयुव्ही सेल्स चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.   

3/10

आपण येथे Tata Punch बद्दल बोलत आहोत. नुकतंच कंपनीने बाजारात अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे. हिची किंमत 6 लाख 12 हजारांपासून सुरु होते.   

4/10

टाटा मोटर्सचं म्हणणं आहे की, टाटा पंच आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत कारच्या 4 लाखापेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.   

5/10

टाटा पंचची खास गोष्ट म्हणजे, ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह CNG पर्यायात उपलब्ध आहे. या इंजिनला 5 स्पीड मॅन्यूअल आणि AMT गेअरबॉक्सने जोडण्यात आलं आहे.   

6/10

या एसयुव्हीत ड्युअल सिलेंडर आहे. म्हणजेच त्याच्या बूटस्पेसमध्ये दोन छोटे छोटे सिलेंडर देण्यात आले आहेत.  

7/10

पण ड्युअल सिलेंडर असला तरी तुम्हाला बूट स्पेसशी कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. यामध्ये 366 लीटरचा बूट स्पेस मिळतो.   

8/10

अपडेटेड पंचमध्ये वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 10.25 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, रियर एसी वेंट आणि युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.   

9/10

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. या एसयुव्हीत ड्युअल एअरबॅग, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रिव्हर कॅमेरासारखे सेफ्टी फिचर्स मिळतात.   

10/10

कंपनीचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हेरियंट 20 किमी/लीटरचं मायलेज आणि सीएनजीमध्ये 26 किमी/किग्रॅ मालयेज मिळतो.