Sharad Pawar NCP: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालंय. बबन शिंदे आणि विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटींना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. 


बबन शिंदे पुन्हा एकदा हाती तुतारी घेणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या शरद पवारांच्या स्ट्राईक रेटची आजही चर्चा होते. लोकसभेत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणत पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एकहाती महाराष्ट्र पिंजून काढत पवारांनी लोकसभेला वारं फिरवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांचा करिष्मा चालणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण, विधानसभा तोंडावर असताना पवारांकडे जोरदार इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा आहे. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. जयंत पाटलांना भेटण्याच्या सूचना पवारांनी बबन शिंदेंनी दिल्यात. 2 तारखेपर्यंत बबन शिंदेंचा पक्षप्रवेश होऊ शकतो अशा चर्चांना उधाण आलंय. त्यामुळं बबन शिंदे पुन्हा एकदा हाती तुतारी घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


अनेक इच्छूकांकडून शरद पवारांची भेट


भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मागील आठवड्यातदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. याशिवाय अनेक इच्छूकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांत काहींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशही केलाय. तर अद्यापही इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचं चित्र आहे.


लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार स्ट्राईक रेट गाठणार?


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार स्ट्राईक रेट गाठणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.