शरद पवार म्हणाले, `सामना`त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही`
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : `सामना`च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे. पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी झाले, अशी टीका काल 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावेळी पवार यांनी भाष्य केले. आम्ही पक्षात काय करतो ते राऊतांना माहिती नाही, असं पवार म्हणाले. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो. तसेच राजकीय भाष्याचा काहीही परिणाम होईल, असं वाटत नाही. आम्ही कर्नाटकमध्ये शून्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही कोणाशी बोललो नाही, असे पवार म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांना टोला
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी अभिवादन केलं. यावेळी साता-यातल्या स्मृतीस्थळावर अजित पवारही उपस्थित होते. भाऊराव पाटील यांच्या स्मृतींना वंदन केल्यावर शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांना संबोधित केले. आज रयत शिक्षण संस्थेची वार्षिक बैठक होणार आहे. त्यालाही शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाला अधिक बळ मिळेल. मात्र, काहीही काम न करता शब्दाचा खेळ करायचे काही लोकांना जमत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा दावा कर्नाटकातील प्रचारात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावेळी पवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. त्यांच्या पक्षात A, B, C अस स्थान आहे. त्यांना खासगीत भेटा. तिथे त्यांचे काय स्थान आहे हे सांगतील. किंवा त्याच्या सहकाऱ्यांना विचारा, असे पवार म्हणाले.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान
मुख्यमंत्री शिंदे अवकाळी पाहणी न करता कर्नाटक दौरा करत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे. पण अनेक ठिकाणी पाहणी करायला कोणी आलेले नाही आणि गेलेले नाहीत. अनेक जण मदतीसाठी वाट पहात आहेत, असे पवार म्हणाले. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, यावर पवार यांनी भाष्य केले.
महाविकास आघाडी जागा वाटपबाबत...
आघाडी भक्कम आहे. महाविकास आघाडी जागा वाटपबाबत मी मुंबई ला गेल्यावर बोलेन. उध्दव ठाकरे आणि नाना पाटोले याच्याशी बोलेन. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे पवार म्हणाले. शेकाप आणि डावे सोबत यावेत यासाठी बोलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
एक न्यायाधीश 14 तारेखाला निवृत्त होत आहेत.. त्यामुळे अपात्र आमदाराचा निकाल लागेल, असे शिवसेनेचे लोक सांगत आहेत. लोकशाही जिवंत राहावे यासाठी आम्ही संघर्ष करतं आहोत. दरम्यान, भाजपच्या 100 आमदारांमुळे ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे नागपूरवरुन आलेला आदेश आणि संस्कार त्यांना पाळावे लागतात, असा टोला पवार यांनी शिंदे यांना लगावला. आज नागपुरात गडकरी आणि शिंदे यांची भेट होत आहे.