Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली. शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केले जाणार आहे. त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक भूमिका आहे आणि आम्हा सगळ्यांची भावना आहे. आजच्या निवड समितीची बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, असे ठरविण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहतील, अशा प्रस्ताव मंजूर केला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sharad Pawar Resignation LIVE Updates : निवड समितीकडून पवारांचा राजीनामा नामंजूर 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपवावी यासाठी शरद पवार यांनी एका समितीचे गठन केले होते. आज कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते एक ठराव पारित केला. हा ठराव म्हणजे तुम्ही अध्यक्षपदावर कायम राहावे, असे ठरले. आता आम्ही ही भावना हा ठराव घेऊन पवार यांना भेटायचा प्रयत्न करु. आम्ही त्यांना भेटून विनंती करणारा आहोत की, तुम्ही पुन्हा अध्यक्षपदी कायम राहावे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.


आम्हाला कोणाला विश्वासात न घेता पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनामा देण्याच्या मनोदय व्यक्त केला होता. आम्हाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे सगळेच नाराज झालेत. आता त्यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे, असे पटेल म्हणाले. राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. पवार यांच्या अनुभवाचा देशाच्या राजकारणाला फायदा झाला आहे. त्यांच्या कामाचं कौतुक देशभरात होत आहे. ते आमचे नेते आहेत. त्यांनी कायम या पदावर राहावे, ही सर्वांची इच्छा आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.


निवड समितीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी फटाकेही फोडण्यात आले. फुले उधळून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. नाचत आणि फुगड्या घालत महिला कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, त्याआधी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी आम्ही त्यांचा राजीनामा स्विकारणार नाही, असे म्हटले होते.