Sharad Pawar LIVE Updates : अजित पवारांना राजीनाम्याची पूर्वकल्पना होती - शरद पवार

Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. 

Sharad Pawar LIVE Updates : अजित पवारांना राजीनाम्याची पूर्वकल्पना होती - शरद पवार

Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : राष्ट्रवादीच्या सदस्यीय समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय...राजीनामा एकमताने नामंजूर करून पवारांकडे पाठवण्यात आलाय...अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत पदावरच राहावं असा ठराव पारित करण्यात आलाय...पवार हे देशाचे नेते आहेत...त्यांची राज्यासह देशाला गरज आहे...त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी राहावं अशी भावना सगळ्यांची आहे...

5 May 2023, 18:26 वाजता

अजित पवार कुठे आहेत?
शरद पवार यानी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार आहेत कुठे असा प्रश्न विचार जात आहे. या ठिकाणी कोण उपस्थित आहे की नाही याची चर्चा आता करु नये. अजित पवार गैरहजर असल्याचा वेगळा अर्थ काढून नका असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय. 

5 May 2023, 17:58 वाजता

शरद पवारच गॉडफादर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम राहाणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपण आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. उत्ताराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आता अधिक जोमाने काम करणार, पक्षात नवीन नेतृत्व घडवण्याचं काम करणार,  माझ्या निर्णयामुळे पदाधिकारी, जनता कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. देशभरातील विविध पक्षांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती, त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. 

 

5 May 2023, 17:39 वाजता

शरद पवारांची पत्रकार परिषद

5 May 2023, 16:13 वाजता

शरद पवार आजच निर्णय घेणार?
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. आता पाच वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. 

 

5 May 2023, 14:29 वाजता

आजच निर्णय घेणार
राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षदी राहायचं की नाही याबाबत शरद पवार आजच निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या समितीनं पवारांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर आता पवार काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

5 May 2023, 13:35 वाजता

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. .एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आलाय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. या ठरावावर आता शरद पवार विचार करणार आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.

5 May 2023, 13:28 वाजता

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार सिल्व्हर, छगन भुजबळ,सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल  आणि सुप्रिया सुळे सिलव्हर ओकवर पोहचल्या.राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा,जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओक वर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल. नरहरी झिरवल आणि राजेश टोपे सिल्व्हर जयंत पाटील, एकनाथ खडसे सिल्व्हर ओक वर पोहचले. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सिल्व्हर ओक वर पोहचत आहेत

5 May 2023, 12:39 वाजता

अजित पवार, प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर दाखल

निवड समितीने सर्वानुमते शरद पवार यांचा राजीनामा नामुंजर केल्यानंतर बैठकीतील सर्व नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत

 

5 May 2023, 12:00 वाजता

 शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला - प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.

5 May 2023, 11:35 वाजता

शरद पवार यांच्या घराचा बंदोबस्त वाढवला

Sharad Pawar Resignation and NCP Meeting Updates : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याची शक्यता आहे.