सातारा : राज्यात भाजपला ( BJP ) सत्ता मिळाली नाही. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळेच महाविकास अगदी सरकारवर सकाळ, दुपार, संध्याकाळी टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. महाविकास आघाडीला सत्ता मिळाली हे या अस्वस्थेचं कारण असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी भाजप ( BJP ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांच्यावर टीका केली.


सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यावर मार्ग कसा काढायचा याबाबत मुख्यमंत्री विचार विनिमय करत आहेत. जो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असाच योग्य निर्णय घेतला जाईल, तो निर्णय लोकांपर्यत कसा नेता येईल हे पहावे लागणार आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


राज्यात अनेक प्रश्न आहेत असे असताना भोंगा हा काही प्रश्न होऊ शकत नाही. पण, काही जण मला जातीयवादी म्हणत आहेत. मला जातीयवादी म्हणणे हा मोठा विनोद आहे. ज्यांनी हा विनोद केला त्याचा मी आस्वाद घेतला. अशा विधानाला लोक हसतात. लोक सिरीयसली घेत नाही, अशी कोपरखळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावली.