दीपक भातुसे, झी मीडिया, रत्नागिरी : कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. या सगळ्या वादावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इथल्या मंत्र्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि देशातल्या आयआयटींनी पण परीक्षा रद्द केल्या आहेत. राज्यपालांचं ज्ञान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त असेल,' असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. शरद पवार हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची शरद पवारांनी पाहणी केली.


'...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला


कोरोना काळामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय द्यायचा निर्णय सरकारने घेतला. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नाही, त्यांना सरासरी मार्क देण्यात येतील, तर परीक्षा द्यायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची योग्यवेळी परीक्षा घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. 


'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार


राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नाराज झाले होते, तसंच त्यांनी राज्यपाल विद्यापीठांचे कुलपती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांची आठवण करुन दिली होती. 


राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांची आठवण