कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प यात्रेची सांगता आज कोल्हापूरमध्ये झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसेच अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्या वर्षभर अनेक संकट असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जयंत पाटील यांनी सगळ्यांना घेऊन दौरा केला. तिथलं दु:ख जाणून घेतलं, या माहिमेचा समारोप आज शाहू नगरीत होत आहे याबद्दल मला आनंद होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश एकसंध ठेवण्याचं आव्हान
आपल्या भाषणात शरद पवार यांनी हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर असल्याचं सांगितलं. २०१४ च्या अगोदर देशात वेगळी स्थिती होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात देशातील प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट घेतले गेले. पण २०१४ ची निवडणूक झाली आणि भाजपाच्या हातात सत्ता आली. त्यानंतर आज देशात वेगळं चित्र दिसतंय. माणसा-माणसात अंतर निर्माण झालं आहे. 


दिल्लीत काही भागात हल्ले, जाळपोळ झाली, त्या ठिकाणी केजरीवाल यांची सत्ता आहे, पण दिल्लीचं गृहखात भाजपाच्या हातात आहे, गृहखात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी देशाची राजधानी एकसंध राहील याची खबरदारी घ्यायला हवी होती, पण ते घेऊ शकले नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली. 


निवडणूकीत मत मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण मताच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवला जात आहे. काश्मीर फाईल चित्रपटाच्या निमित्ताने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला.


पंतप्रधान मोदींवर निशाणा
अनेक देशांचे पंतप्रधन गुजरातमध्ये गेले, आम्हाला गुजरातबद्दल अभिमान आहे, पण एकाच राज्यात जगातले पंतप्रधान जात आहेत, हा संकुचीत विचार आहे, असं सांगत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. सत्ता येते आणि जाते, पण सत्ता आल्यानंतर पाय जमिनीवर पाहिजे, सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही असंही शरद पवार यांनी सुनावलं.


ईडीचा दबाव आणला जात आहे
ईडी ठिकठिकाणी पाठवली जात आहे, दबाव आणला जात आहे, राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना जेलमध्ये टाकलं, आधी १०० कोटींचा आरोप केला, नंतर ४ कोटी आता म्हणतात १ कोटी, एका अधिकाऱ्यावर टीका केली म्हणून नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकलं, २० वर्षांपूर्वी एक जमीन घेतली त्यासाठी मलिक यांना जेलमध्ये टाकलं, यांना वाटत असेल ईडी आणि इतर यंत्रणेचा वापर करुन जेलमध्ये टाकल्यानंतर सगळे गप्प बसतील, पण असं जर त्यांना वाटत असले तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, असं इशारा शरद पवार यांनी दिला.


चंद्रकांत पाटील यांची खिल्ली
शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाणार असं म्हटलं होतं, चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यावर जयंत पाटील यांनी मी पण जाणार असं म्हटलं, मी जयंत पाटील यांना विचारलं, तू कशाला जातो, तर जयंत पाटील म्हटले मी चंद्रकांत पाटील तिथे जातात का पाहतो असं म्हटलं, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.