Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. दरम्यान,आजचा वर्धापन दिन चर्चे आहे तो नव्या बदलामुळे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत नवे बदल केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल करण्यात आले आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. 


शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरुन चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या राजीनामा परत घ्या, याच्या दबावामुळे पवार यांनी आपला निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनात मोठा धक्का दिला. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे. 


पटेल, तटकरे, आव्हाड यांच्यावर मोठी जबादारी


प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना देखील कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे.


तसेच सुप्रियायांच्यावर महिला युवक, युवती आणि लोकसभेचीही जबाबदारी असणार आहे. तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. 


'देशात वेगळं वातावरण तयार करण्याचे काम सुरु'


यावेळी शरद पवार म्हणाले, काम करता करता 24 वर्षे  पूर्ण झाले. हजारो लोकांनी मेहनत घेतली. ( Sharad Pawar speech) त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. केरळ सारख्या राज्यात काम करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली.  नागालॅंड सारखे महत्त्वाच्या राज्यात 7 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. तिथे भाजपच्या उमेदवाराना हरवले. आज देशात वेगळं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केली. आम्ही 23 तारखेला बिहारमध्ये बैठक घेणार आहेत. मेहनत करु आणि देशात परिवर्तन आणू, असे ते म्हणाले.


पवारांनी व्यक्त केली चिंता 


जातीयवादी विचारांना महत्त्व दिले जात आहे. महिलांवर अत्याचार होताहेत अशी स्थिती निर्माण करण्याचे काम होत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच हे करताहेत. एक दिवस असा जात नाही की जिथे कोणत्या भागात महिला दलित आदिवासी अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार होत नाही. अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी नसल्याचं त्यांना वाटतं. आज शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव दिला नाही. त्यासंदर्भात कोणती योजना राबविली नाही. आज देशातील नवीन पिढी समोर मोठी समस्या आहे. आज तरुण हतबल आहे.


शेतकरी , महिला, आदिवासी, दलितांची रक्षण करण्यात हे सरकार कमी पडले आहे. आज सामान्यांना लक्षात आलंय वचनं पूर्ण होण्यात यशस्वी होत नाहीत. देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तमिळनाडूत भाजप नाही, कर्नाटकात भाजप नाही, आंघ्र प्रदेशात भाजप नाही, ओरिसात भाजप नाही , राजस्थान, पंजाब, दिल्ली इथे भाजपला दूर ठेवण्याचे काम जनतेनं केले आहे, असे ते म्हणाले.