कोजागिरी पौर्णिमेचे महत्व आणि मुहूर्त
अशी साजरी करा कौजागिरी पौर्णिमा
मुंबई : अश्विन पौर्णिमेची रात्र कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवून हिंदू धर्मात लक्ष्मी आणि इंद्राची आराधना केली जाते. चांगल्या आरोग्यासाठी कोजागिरीच्या रात्री व्रत केली जाते.
यंदा रविवारी 13 ऑक्टोबर दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि को जागती? असा प्रश्न विचारते आणि त्याला वैभवप्राप्ती मिळते अशी आख्यायिका आहे.
कोजागिरीचा मुहूर्त काय?
कोजागिरी हा सण अश्विन पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जातो. 13 ऑक्टोबर रात्री हा लक्ष्मी आणि इंद्राची पूजा केली जाणार आहे.
पौर्णिमा तिथी प्रारंभ : 13 ऑक्टोबर 2019 रात्री 12:36 मिनिटं
पौर्णिमा तिथी समाप्त : 14 ऑक्टोबर 2019 रात्री 2:38 मिनिटं
चंद्रोदय वेळ : 13 ऑक्टोबर 2019 संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिटं
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. अशी भावना असते की रात्री लक्ष्मी मातेचा वास असतो आणि ती भक्तांना धन-धान्य लाभो असा आशिर्वाद होतो. या दिवशी रात्रभर जागून लक्ष्मी मातेचं भजन केलं जातं. या रात्री जागणाऱ्या भक्तांना लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो. म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं.
कोजागिरीच्या शुभेच्छा देणारे मराठी मॅसेज
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीत आमची कामना
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
मंद प्रकारश चंद्राचा
त्यास गोड स्वाद सुधाचा
विश्वास वाढू द्या नात्याचा
त्यात असूद्या गोडवा साखरेचा
आपण व आपल्या परिवारास
माझ्यातर्फे गोड गोड शुभेच्छा