विशाल करोळे, झी २४ तास, संभाजीनगर: तुम्हाला डर मधला शाहरूख खान आठवतोय? क.. क.. क.. किरण म्हणत जुही चावलाला त्रास देणारा. त्याच शाहरूखचा नवा अवतार संभाजीनगरमध्ये अवतरलाय. क्रांती चौक परिसरात राहणारा सचिन नावाचा हा तरुण. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर त्याचं प्रेम जडलं. मग काय? लव्ह के लिए साला कुछ भी करेगा... या विवाहितेशी जवळीक साधण्याचा खटाटोप त्यानं सुरू केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहितेच्या नवऱ्याचं कुणा महिलेसोबत लफडं सुरू असल्याचं त्यानं आधी सांगितलं. नवऱ्याचे पुरावे देण्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेशी सलगी वाढवली. दोघांची मैत्री वाढली मग त्यांनी एकमेकांसोबत सेल्फी काढले. मात्र त्यानं प्रेमाची कबुली देताच महिलेनं त्याला दूर केलं. तेव्हापासून त्यानं विवाहितेला धमक्या द्यायला सुरूवात केली


'I LOVE YOU म्हण, नाहीतर गल्लीत बॅनर लावतो' अशा धमक्या देण्याचं काम या पोराने सुरु केलं. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दोघांचे फोटो व्हायरल करतो, अशाही धमक्या त्यानं दिल्या. फोन ब्लॉक केला तरी तो दुसऱ्या फोनवरून त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अखेर तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 



या तरुणानं विवाहित महिलेचा इन्स्टाग्राम आयडी आणि पासवर्डही घेतला होता. त्यावरही फोटो व्हायरल करण्याची धमकी तरुणानं दिली. पोलीस आता या टपोरी मजनूचा कसून तपास करत आहेत. विवाहित महिलांना अशाप्रकारे छळऱ्यांना चांगलीच अद्दल घडायला हवी.