बुलढाणा : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेगावचं गजानन महाराज मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे  विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातही ५६ तास बंद करण्यात आलं आहे. यावेळी भाविकांना दर्शन घेता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेगावचं गजानन महाराज मंदिर आदेश येईपर्यंत बंद ठेवणार आहेत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. अमरावतीत रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनसदृष स्थिती आहे. विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांसाठी संचारबंदीचे आदेश अधिक कडक केले आहेत.पुढील आदेशापर्यंत देऊळ बंदचा निर्णय श्री संत गजानन महाराज संस्थानेतनं घेतला आहे. 


अमरावती शहरात आणखी आढळले कोरोनाचे ६ नवे कंटेन्मेंट झोन तयार झाले असून शहरात ए८कूण १ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. अमरावती (Amravati Disctrict) शहरासह अचलपुरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


शहरात ६० टक्के भागात कोरोना पसरल्याची महापालिका आयुक्तांनी माहिती दिली आहे. अमरावती आणि अचलपूर शहरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आज सायंकाळी ७ वाजल्यापासून एक आठवडा कडकडीत बंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णय घेतला आहे. 


अमरावती आणि अचलपूर शहरात पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजल्यापासून एक आठवडा अमरावती जिल्ह्यात कडकडीत बंद असणार आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा निर्णय घेतला. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती. सोबतच कोरोना संकटातही नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत होता. त्यामुळे अखेर एक आठवडा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.