Thackeray Shinde Together - सध्या राजकीय पटलावर ठाकरे आणि शिंदे यांच्यातून ( Eknath Shinde And Uddhav Thackeray) विस्तवही जात नाही. शिंदे यांचं वेगळे झाल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कालच झालेल्या दसरा मेळाव्यात मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे एकमेकांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली सर्वसाधारण शिवसैनिकांना विचारलं तर त्यांना अजूनही सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र यावं असं वाटतंय. इतके वर्ष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसैनिक, इतके वर्ष एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या शिवसैनिकांमध्ये देखील उभी फूट पडली आहे. राजकीय विश्लेषकांना याबाबत विचारलं तर दोघांमध्ये दिलजमाई होईल असं वाटतं नसल्याचं उत्तर मिळतं. मात्र महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची मनं जुळली आहेत, आणि तिथे ठाकरे आणि शिंदे यांनी यापुढे सर्व सुख दुःखात एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे अधिकृत फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरं तुम्ही विचार करत असेलेले हे ठाकरे आणि शिंदे नाहीत. हे ठाकरे आणि शिंदे आहेत जुन्नरचे ठाकरे आणि शिंदे. सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होतेय. हे लग्न आहे शिंदे कुटुंबातील चिरंजीव रमेश शिंदे आणि वधू आहेत ठाकरे कुटुंबातील अनुराधा ठाकरे यांच्यामध्ये. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे लग्न आणि ही लग्नपत्रिका प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरलाय. 


कोण आहेत वर आणि वधू ... 



रमेश शिंदे आणि अनुराधा ठाकरे येत्या 8 तारखेला लग्नगाठ बांधणार आहेत. अनुराधा  या जुन्नर आंबेगावातील साल गावच्या ठाकरे कुटुंबातील आहेत. तर रमेश ठाकरे म्हणजेच जुन्नरच्या वडगाव सहाणी गावातील मा. सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे आहेत. ही माहिती व्हायरल लग्नपत्रिकेवर छापण्यात आलेली आहे. 


सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैरा. राजकीय वैर संपेल असं वाटत नाही. मात्र दुसरीकडे जुन्नरच्या ठाकरे आणि शिंदे यांचं एकत्र येण्याचं ठरलंय. त्यांना शुभेच्छा!