राज्यपाल थोड्याच दिवसात जातील; आमदार भरत गोगावले यांचे वक्तव्य
राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ अस गोगावले यांनी म्हटल आहे. राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे यावर गोगावले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
सागर आव्हाड, झी मीडिया, रायगड : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पेटले. अशातच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले(MLA Bharat Gogawle) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. राज्यपाल थोड्याच दिवसात जातील असं भरत गोगावले यांनी म्हंटले आहे.
कोश्यारी यांनी महाराजांचा अवमान केल्यानंतर राज्यभर विविध संघटना आणि विरोधी पक्षाकडून राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यपाल हटाव अशी मागणी करण्यात येत आहे. यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोत आमदार भरत गोगावले यांनी मोठ विधान केलं आहे.
राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ अस गोगावले यांनी म्हटल आहे. राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे यावर गोगावले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कुठल्याही पक्षाचे नेते असो की कार्यकर्ते असो कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान करू नये. ते आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांचं मान हे सर्वांनी ठेवलं पाहिजे अस देखील यावेळी गोगावले यांनी म्हटल आहे.