Maharashtra Politics : शिवसेनेच्या (Shivsena) फुटीनंतरही ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांविरुद्ध पेटून उठले आहेत. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) शिंदे गटावर (Shinde Group) गद्दारी केल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरे गटावर निशाणा साधला जात आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील असा टोला संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ठाण्याचे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या मृत्यूनंतर जी डायरी सापडली  त्यात जी नावे आहेत ती आम्हाला माहिती आहेत. त्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी," असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


सत्ता होती तुम्ही काहीही चौकशी केली नाही


"अडीच वर्षाच्या काळात ईएस कोण, डीएस कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता .आता त्यांच्या कामाचा झंजावात सुरू आहे. दिशा सालियनप्रकरणी AU कोडवरून टीका झाली. त्याला ES कोड पुढे करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी सांगितलं होतं की, सीबीआयने चौकशी केली आहे. आता सीबीआयने उघड केलं की, सीबीआयने अशी कोणतीही चौकशी केलेली नाही. म्हणजे यांनाच पूर्ण माहिती नाही म्हणून असल्या पद्धतीने रिकामे आरोप केले जात आहेत," असेही संजय शिरसाठ म्हणाले.



संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील


"शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे चालवतच नाहीत. ते राष्ट्रवादी चालवत आहे आणि संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. माध्यमांनी ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत हा गैरसमज डोक्यातून काढावा. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना पक्ष कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी ते करत आहेत. जेव्हा शिवसेना संपेल, तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील," असा टोलाही संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.