शिर्डी : शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय. शिर्डीच्या साईबाबांना समाधीस्थ होण्यास पुढच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण होताय या अनुषंगाने येत्या 15 आँक्टोबरपासून साई संस्थान आणि ग्रामस्थ मिळून साई समाधी शताब्दी सोहळ्यास सुरवात करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईंच्या कार्याचा प्रसार आणि प्राचर करणे तसेच साई समाधी वर्षाची महती सर्वदुर पसविण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडुलकर यांची नेमणुक करण्याची साईसस्थानची इच्छा असुन त्यासाठी या दोघांशी साई संस्थानने संपर्क साधण्यास सुरवात केली आहे, असं संस्थानानं म्हटलंय. आता प्रश्न आहे की साईंची शिकवणच इतकी ताकदवान असताना ्रँड अॅम्बेसेडर नेमून संचालक मंडळ स्वतःच्या अकेलीची दिवाळखोरी का उघड करू पाहतंय.