शिर्डीत साई संस्थान विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष, १६ आंदोलकांना अटक
शिर्डीत साई संस्थान विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष रंगतोय.
अहमदनगर : शिर्डीत साई संस्थान विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष रंगतोय. शिर्डी संस्थानचा पन्नास कोटींचा निधी दुष्काळासाठी वापरण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देण्यात आलाय. मात्र शिर्डीतील विकासकामांना निधी देत नसल्याचा आक्षेप घेत संस्थान अध्यक्षांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी १६ आंदोलकांना अटक करण्यात आलीय. या सर्वांवरुन आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.
शिर्डीत काल सुरेश हावरे यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी काँग्रेस समर्थक १६ जणांना विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला दंगलीचा आणि एका विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करत या सर्वांना रात्री पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, विरोध पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी आज सकाळी पोलीस स्टेशनला भेट देवून झालेल्या प्रकरा बद्दल माहीती घेतली. या वेळी विखे-पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वच ठिकाणी मनमानी कारभार सुरू. प्रत्यक स्थानिक सुराज्य संवस्थेत आपले माणसे बसवायचे आणि मनमानी कारभार यांच्याकडून करू घेत आहे, असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केला.
राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे शासनाकडे पैसे नसल्याने साई संस्थांचे पैसे दुष्काळसाठी तिकडे वळवत असल्याच आरोप सुजय विखे यांनी केले आहे. शिर्डी साईबाबांच्या पैश्यावर सर्वांचा अधिकार आहे मात्र हा पैसा आधी शिर्डीच्या विकासावर खर्च करावा. या विरोधात आमच्या शिर्डीतील नगरसेवकांनी आंदोलन केले होते. लवकरच या पेक्षा ही मोठे आंदोलन आम्ही करणार असल्याच सुजय विखे शिर्डीत म्हटलंय.