पुणे : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी प्रशासनाकडून सर्वत्र सतर्कता पाळण्यात येत आहे. याच धर्तीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वांनाच सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. ज्यानंतर लगेचच किंबहुना त्याआधीपासूनच राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये भाविकांसाठीचा प्रवेश बंद करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डी येथील साईबाब मंदिर प्रशासनानेही आता हा निर्णय अंमलात आणण्यास सुरुवात केली असून, मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाविषयीची वाढती दहशत आणि त्याचा अतिशय झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. 


सध्याच्या घडीला समोर येणाऱ्या माहितीनुसार जनसंपर्क आणि बायोमेट्रिकच्या माध्य़मातून देण्यात येणारे पासही बंद करण्यात आले आहेत. पास असणाऱ्या भाविकांचं दर्शन पाच वाजण्याच्या सुमारा हे भाविक मंदिराबाहेर येतील. परिणामी सायंकाळी धुपारतीसाठी मंदिरात फक्त पुजाऱ्यांची उपस्थिती असेल असा अंदाज वर्तण्यात येत आहे. 



वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला


येत्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेला गुढीपाडवा, राम नवमी हे महत्त्वाचे दिवस पाहता शिर्डीनगरीकडे येणाऱ्यांचं प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा होती. पण, कोरोनाच्या कहरामुळे भाविकांना आणि असंख्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अखेर शासनाने दिलेले निर्देश पाळत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या अंतिम निर्णयावर संबंधित संस्थानचे अधिकारी पोहोचले आहेत.